राज्य कर्मचारी संदर्भात दि.02.01.2026 रोजी 06 शासन निर्णय (GR) निर्गमित !

Maha.School प्रणिता पवार प्रतिनिधी [ 06 Government Decisions (GR) issued on 02.01.2025 regarding state employees! ] : राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 02 जानेवारी 2026 रोजी 06 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .

01.दिव्यांग विभाग : दिव्यांगांच्या विशेष शाळा तसेच कार्यशाळा चालविणाऱ्या संस्थांचे नोदंणी प्रमाणपत्र रद्द झाल्याने किंवा पटनिर्धारण नंतर विद्यार्थी संख्या कमी आढल्याने अथवा इतर कारणास्तव अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन करणेकामी कागदपत्रांची सुची निश्चित करण्यात आली आहे .

02.गृह विभाग : पोलिस वसाहतीमधील घरे पोलिस अधिकारी / कर्मचारी यांना मालकी स्वरुपात देता येतील काय ? याचा धोरणात्मक निर्णय घेणेकरीता व सर्व कायदेशिर तांत्रिक तथा आर्थिक बाबी तपासणे करीता अभ्यास समिती गठीत करणेबाबत निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

03.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : जिल्हा परिषद आस्थापनेवरील पायाभूत पदांची ( प्राथमिक ) संख्या निश्चित करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे .

04.महसुल व वन विभाग : महसुल व वन विभागातील गट ब ( अराजपत्रित ) , गट क व गट ड संवर्गातील सरळसेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने सुधारित कार्यपद्धती तसेच मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आले आहेत .

05.उद्योग , उर्जा , कामगार व खनिकर्म विभाग : राज्यसेवा परीक्षा 2021 नुसार शिफारस प्राप्त ठरलेल्या व एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम – 09 अंतर्गत प्रशिक्षण पुर्ण केलेल्या उद्योग उपसंचालक ( तांत्रिक ) गट अ या संवर्गातील अधिकाऱ्यांना नियमित पदस्थापना देणेबाबत निर्गमित करण्यात आला आहे .

06.कृषी व पदुम विभाग : सहाय्यक मत्सव्यवसाय विकास अधिकारी गट क ( तांत्रिक ) या संवर्गातुन मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी व तत्सम गट ब ( तांत्रिक ) या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत मंजूरी देण्यात आली आहे .

वरील बाबत 06 GR डाऊनलोड करणेकरीता Click Here

Leave a Comment