Maha. school संगीता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai bhatta vadh news] : सातवा वेतन आयोगानुसार (7th Pay commission) केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना दिनांक 01 जुलै 2025 पासून 03 टक्के महागाई भत्ता (DA ) वाढ लागू केली आहे .
केंद्र सरकारच्या याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सातवा वेतन आयोग (7th pay commission ) अंतर्गत वेतन / पेन्शन घेणाऱ्या राज्य सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना तीन टक्के महागाई भत्ता (DA ) वाढ लागू करण्यात येणार आहे .
सद्यस्थितीमध्ये राज्यात निवडणुक कार्यक्रम सुरू असल्याने , आचारसंहितामुळे महागाई भत्ता वाढीचा निर्णय प्रलंबित आहे . या महिन्याच्या अखेरपर्यंत महागाई भत्ता वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सदर मंजुरीनंतर माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी 2026 च्या वेतन / पेन्शन देयकासोबत राज्य कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना दिनांक 01 जुलै 2025 पासून महागाई भत्ता फरकासह वाढीव तीन टक्के महागाई भत्ता लागू केला जाईल .
यामुळे राज्य कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना जुलै पासून ते डिसेंबर पर्यंतच्या एकूण सहा महिने कालावधी मधील महागाई भत्ता थकबाकी अदा केली जाईल.
प्राप्त माहितीनुसार वित्त विभाग मार्फत DA वाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून , लवकरच सदर प्रस्तावास मंजुरी दिली जाईल.