राज्य NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण GR ( वित्त विभाग ) – जाणून घ्या सविस्तर .

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Very important GR for state NPS holders employees Finance Department ] : राज्यातील राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत येणाऱ्या राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभाग मार्फत दि.28.03.2025 रोजी निर्गमित शासन निर्णय निर्गमित आहे .

राज्यातील कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 20.09.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनांनी लागु केलेली सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये सहभागी घेण्याकरीता विकल्प देण्यात आलेली होती .

सदर विकल्प देण्यास मुदतवाढ देणेबाबत , वित्त विभागाच्या दि.28.03.2025 रोजीच्या निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत . या निर्णयानुसार राज्य NPS धारकांना राज्य सरकारच्या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS ) योजनांमध्ये सहभाग घेण्याकरीता ..

दिनांक 31 मार्च 2026 ही अंतिम मुदतवाढ असणार आहे . या मुदतीपर्यंत अधिकारी / कर्मचाऱ्यांनी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये सहभाग घेण्याकरीता आपल्या कार्यालय प्रमुख / आस्थापना प्रमुख यांच्याकडे विकल्प सादर करावयाचा आहे .

यापुर्वी मुदतवाढ देण्यात आलेली होती , आता सदरची मुदतवाढ ही अंतिम असणार आहे . यामुळे NPS धारक राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांनी सदर मुदत मध्ये विकल्प सादर करावयाचा आहे . अन्यथा सदर योजनांमध्ये आपणांस सहभाग घेता येणार नाही .

Leave a Comment