Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ The government’s big decision for employees in the backdrop of the municipal elections. ] : राज्यांमध्ये नुकतेच नगरपरिषदा / नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या , निकाल देखिल लागले . आता राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणूका दि.15 जानेवारी रोजी होणार आहेत .
निवडणूक म्हटल्या कि , कर्मचाऱ्यांना कामाचा बोजा अधिक वाढून जातो . यांमध्ये प्रशिक्षण , मशीन हाताळणे , अहवाल विहीत काळांमध्ये सादर करणे , मतदानाचा अभिलेख ठेवणे इ. कामे निकाल लागे पर्यंत काळजीपुर्वक पार पाडावे लागते .
राज्यांमध्ये सुरु असणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात स्थानिक सुट्टी दिली जात आहे . सदरची सुट्टी ही राज्यातील सर्व प्रकारच्या सरकारी / निमसरकारी तसेच इतर पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचबरोबर खाजगी क्षेत्रांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना देखिल सदर स्थानिक सुट्टीचा लाभ ते देखिल भरपगारी मिळणार आहे .
राज्य सरकारने शासन निर्णय निर्गमित करुन राज्यात दि.15 जानेवारी 2026 रोजी महानगरपालिका निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कर्मचाऱ्यांना स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .
यांमध्ये देशातील शेअर बाजार देखिल बंद करणेबाबत भारतीय रिझर्व बँकेकडून लवकरच परिपत्रक निर्गमित केले जाणार आहे . सदरची सुट्टी ही राज्यतील 29 महानगरपालिका क्षेत्राच्या मतदान यांदीमध्ये नाव असणाऱ्यांना सर्वांना सदर स्थानिक सुट्टीचा लाभ मिळणार आहे .
सदर सुट्टी कोणताही आस्थापना प्रमुख नाकारु शकत नाही , अन्यथा कर्मचाऱ्यांच्या तक्रारी अंती सदर आस्थापना प्रमुखांवर कायदेशिर कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत .