Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Government decision of the Finance Department regarding increase in pensions according to age; Approval to increase from 01.01.2024. ] : वयानुसार निवृत्तीवेतनांमध्ये वाढ करणेबाबत राज्य सरकारच्या वित्त विभाग मार्फत दि.16 जानेवारी 2024 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित आहे .
सदर शासन निर्णयानुसार नमुद आहे कि , दिनांक 01.01.2024 पासुन निवृत्तीवेतनात वयानुसार वाढ करण्याचे निर्देश आहेत . सदर निवृत्तीवेतन हे निवृत्तीवेतन धारक तसेच कुटुंब निवृत्तीवेनतधारकांसाठी देखिल लागु आहेत .
सदर सुधारित निवृत्तीवेतन हे दि.01.01.2024 पासुन देय आहे , तर सुधारित दरप्रमाणे फरकाची रक्कम अनुज्ञेय असणार नसल्याची बाब नमुद आहे . सातवा वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतनांमध्ये दि.01.01.2019 पासुन सुधारणा करण्यात आलेली आहे . तर सदर सुधारीत निवृत्तीवेतन वाढ ही दि.01.01.2024 पासुन करण्यात येत आहे .
| अ.क्र | वय | मूळ निवृत्तीवेतनातील वाढ |
| 01. | वय वर्षे 80-85 | 20% |
| 02. | वय वर्षे 85-90 | 30% |
| 03. | वय वर्षे 90-95 | 40% |
| 04. | वय वर्षे 95-100 | 50% |
| 05. | वय वर्षे 100 पेक्षा अधिक | 100% |
वरील तक्ता नमुद केल्याप्रमाणे वय व मूळ निवृत्तीवेतनातील वाढ करण्यात आलेली आहे . सदर निवृत्तीवेतन मधील रकमेची परिगणना करण्याची जबाबदारी ही निवृत्तीवेतन संवितरण प्राधिकारी , अधिदान व लेखा अधिकारी मुंबई / कोषागार अधिकारी यांची आहे .

आपण सरकारी / निमसरकारी कर्मचारी , निवृत्तीवेतन धारक असाल तर खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा.
