आज दि.09 जानेवारी रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित .

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Today, on January 9th, 04 major important government decisions were issued regarding state officers/employees. ] : आज दिनांक 09 जानेवारी 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .

01.दिव्यांग कल्याण विभाग : मुकबधीर , मतिमंद व अस्थिव्यंग या प्रवर्ग मधील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहायक अनुदाने ( यांमध्ये वेतन ) निधी वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे .

02.पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मधील यांत्रिकी संवर्ग मधील अभियंत्यांना जलसंपदा विभागाचे सेवाप्रवेश नियम लागु करणेबाबत , मंजूरी देण्यात आलेली आहे .

03.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : सन 2025-26 या आर्थिक वर्ष करीता राष्ट्रीय निवृत्तीवेतन ( NPS ) अंतर्गत केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणाकडून सर्व डीटीओ यांना पुरविण्यात येणाऱ्या सेवेचे त्रेमासिक शुल्क अदा करण्याकरीता निधीचे वितरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

04.महसुल व वन विभाग : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांची 36 पदे व विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयकांची एकुण 06 पदे अशा एकुण 42 कंत्राटी पदांना मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

या संदर्भातील 04 GR डाऊनलोड करणेकरीता Click Here

Leave a Comment