Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Government Resolution regarding the payment of overtime allowance, remuneration allowance, diet allowance, and TA/DA to state officers/employees as per the revised rates. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुधारित दरानुसार अतिकालिक भत्ता , पारिश्रमिक भत्ता , आहारभत्ता , TA / DA अदा करणेबाबत सा.प्र.विभाग मार्फत दि.24.11.2025 रोजी GR निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या निवडणुक कामकाज करीता नियुक्त अधिकारी / कर्मचाऱ्यांना देय अतिकालिक भत्ता , पारिश्रमिक भत्ता , आहारभत्ता , TA / DA सुधारित दर पुढीलप्रमाणे सुधारित करण्यात येत आहेत .
निवडणुक भत्ता सुधारित दर :
| अधिकारी / कर्मचाऱ्यांचे पदनाम | विद्यमान दर | सुधारित दर |
| क्षेत्रिय दंडाधिकारी | 1500/- एकत्रित एकदा | 1500/- एकत्रित एकदा |
| मतदान केंद्राध्यक्ष / मतमोजणी पर्यवेक्षक | 350/- प्रत्येक दिवसाकरीता / दिवसाच्या भागाकरीता | 500/- प्रत्येक दिवसाकरीता / दिवसाच्या भागाकरीता अथवा 2000/- एकत्रित एकदा |
| मतदान अधिकारी | 250/- प्रत्येक दिवसाकरीता / दिवसाच्या भागाकरीता | 400/- प्रत्येक दिवसाकरीता / दिवसाच्या भागाकरीता किंवा 1600/- एकत्रित एकदा |
| मतमोजणी सहाय्यक | 250/- प्रत्येक दिवसाकरीता / दिवसाच्या भागाकरीता | 450/- प्रत्येक दिवसाकरीता / दिवसाच्या भागाकरीता किंवा 1350/- एकत्रित एकदा |
| चतुर्थश्रेणी कर्मचारी | 200/- प्रत्येक दिवसाकरीता / दिवसाच्या भागाकरीता | 350- प्रत्येक दिवसाकरीता / दिवसाच्या भागाकरीता 1400/- एकत्रित एकदा |
| फिरते पथक | वर्ग 01 / वर्ग 02 करीता 1200/- एकत्रित एकदा वर्ग -3 करीता 1000/- एकत्रित एकदा | वर्ग 01 / वर्ग 02 करीता 3000/- एकत्रित एकदा वर्ग -3 करीता 2000/- एकत्रित एकदा |
| आयकर निरीक्षक | 1200 एकत्रित एकदा | 3000/- एकत्रित एकदा |
| सुक्ष्म निरीक्षक | 1000/- एकत्रित एकदा | 2000/- एकत्रित एकदा |
कामकाज कालावधीत देय सुधारित आहार भत्ता :
| अधिकारी / कर्मचाऱ्यांचे पदनाम | विद्यमान दर | सुधारित दर |
| मतदान केंद्र / मतमोजणी केंद्रावर निवडणुक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी / कर्मचारी यांच्यासहित पोलिस अधिकारी / कर्मचारी , मोबाईल पथके , होमगार्ड , वनरक्षक दल , ग्रामरक्षक दल , NCC कॅडेटस , माजी सैनिक , स्वयंसेवक | 150/- प्रत्येक दिवशी किंवा दिवसाच्या भागाकरीता | 500/- रुपये दिवसाकरीता किंवा दिवसाच्या भागाकरीता |
निवृत्ती वेतनासाठी (पेन्शन ) अत्यंत महत्त्वपूर्ण GR संकलित (PDF स्वरुपात) पुस्तिका फक्त 100/- रुपये मध्ये , लगेच PDF स्वरुपात खरेदी करण्यासाठी Click Here
सुधारित दरानुसार देय TA / DA
| अधिकारी / कर्मचाऱ्यांचे पदनाम | विद्यमान दर | सुधारित दर |
| निवडणुक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी / कर्मचारी | 100% प्रवास भत्ता / दैनिक भत्ता रक्कम ( TA / DA ) | 100% प्रवास भत्ता / दैनिक भत्ता रक्कम |
सदरचे सुधारित दर हे सदर शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासुन म्हणजेच दिनांक 24.11.2025 पासुन लागु करण्यात आलेला आहे .
या बाबत GR डाऊनलोड करणेकामी Click Here