Advance : राज्य कर्मचाऱ्यांना या 05 आजाराच्या उपचार करीता  मिळते 1.5 लाख रुपये वैद्यकीय अग्रिम ; सविस्तर GR पाहा .

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Advance: State employees get a medical advance of Rs. 1.5 lakh for the treatment of these 05 diseases. ] : राज्य कर्मचाऱ्यांना विविध प्रयोजन करीता अग्रिम देण्याची तरतुद आहे , यापैकी वैद्यकीय कारणास्तव 1.5 लाख रुपये पर्यंत वैद्यकीय अग्रिम ( Advance )  देण्याची तरतुद आहे .

या संदर्भात राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दि.10.02.2006 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित आहे . यानुसार राज्य कर्मचाऱ्यांना खाली नमुद 05 आजाराच्या शस्त्रक्रियाच्या उपचार करीता 1.5 लाख रुपये पर्यंत वैद्यकीय अग्रिम मिळते .शस्त्रक्रिया आजाराची यादी पुढीलप्रमाणे आहे .

अ.क्रआजराचे नाव
01.हृदय शस्त्रक्रियांची प्रकरण
02.हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया
03.ॲन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया
04.मुत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया
05.रक्ताचा कर्करोग

वरील नमुद 05 आजारांच्या शस्त्रक्रिया करीता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1.5 लाख रुपये पर्यंत वैद्यकीय अग्रिम देण्याची तरतुद आहे . याकरीता आपल्या कार्यालयास विहीत नमुन्यात अर्ज सादर करावे लागेल .

याशिवाय शस्त्रक्रिया करीता लागणारा अंदाजित खर्च संबंधित रुग्णालयाचे सदर अर्जासोबत जोडावे लागेल . सदर उपचार हे शासनमान्य खाजगी रुग्णालयांमध्ये करणे आवश्यक असेल .

Leave a Comment