वर्ग -04 कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या या 02 भत्यांमध्ये वाढ करणेबाबत सुधारित GR

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Revised GR regarding increase in these 02 allowances available to Class-04 employees ] : वर्ग  04 कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या या 02 भत्यांमध्ये वाढ करणेबाबत , सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.10.10.2024 रोजी सुधारित शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील वर्ग 04 ( चतुर्थी श्रेणी ) कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या शिलाई दर व धुलाई भत्ता मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी दिली गेली आहे . सुधारित दर पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

शर्ट पँट शिलाई दर : दोन वर्षातुन एक वेळा दिला जाणार शर्ट पँट शिलाई ही यापुर्वी 250/- रुपये प्रति जोडी ( एक शर्ट व एक पँट ) करीता देण्यात येत होता , आता यामध्ये सुधारणा करुन सुधारित दर हे 750/- रुपये प्रति जोडी ( एक शर्ट व एक पँट )

ब्लाऊजचा शिलाई दर : यापुर्वी 50/- रुपये प्रति ब्लाऊज तर आता सुधारित दरानुसार प्रति ब्लाऊज 250/- रुपये अशी सुधारणा करण्यात आली आहे . ( सदर दर प्रति दोन वर्षातुन एकदा करीता आहे )

धुलाई भत्ता : पुर्वीप्रमाणे धुलाई भत्ता दर हे 50/-रुपये होते , तर यांमध्ये वाढ करुन सुधारित दर 250/- रुपये करण्यात आले . यांमध्ये वेतनात चक्क 200/- रुपयांची वाढ झाली आहे .

लोकर गणवेश : चार वर्षातुन एक वेळा लोकर गणवेश शिलाई चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना मिळते , यापुर्वी याचे दर हे 350/- रुपये इतके होते , तर सुधारित दर हे 1500/- रुपये असे करण्यात आले आहेत .

Leave a Comment