राज्य कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपुर्ती करीता शासन मान्यता देण्यात आलेली खाजगी रुग्णालयांची यादी GR !

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ List of private hospitals approved by the government for reimbursement of medical expenses of state employees GR. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपुर्ती करीता शासन मान्यता देण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयांची यादी जाहीर करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दि.11.10.2013 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकातील नमुद खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय उपचार वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपुर्तीकरीता सरसकट नाकारणे योग्य असणार नाही . यामुळे सदर यादीमधील समाविष्ट करण्यात आलेल्या खाजगी मान्यताप्राप्त रुग्णालयातील व इंडियन कॅन्सर सोसायटीशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयातील देयके प्रतिपुर्तीकरीता विचारात घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

सदर वैद्यकीय प्रतिपुर्ती ही कर्मचाऱ्यांच्या स्वत : च्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या वैद्यकीय उपचाराच्या अनुज्ञेय असेल . शासन मान्यता देण्यात आलेल्या खाजगी रुग्णालयांची अद्ययावत यादी सदर शासन परिपत्रकांमध्ये नमुद आहे .

यांमध्ये आजारनिहाय (मधुमेह , ऑर्थोपेडीक उपचार ,लहान मुलांचे आजार , रक्ताचा कर्करोग व इतर कर्करोग , मुत्रपिंड प्रतिरोपण इ. ) मान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयांची यादी देण्यात आलेली आहे .सदर मान्यता प्राप्त खाजगी रुग्णालयांमध्येच राज्य कर्मचाऱ्यांनी उपचार घ्यावे ,जेणेकरुन वैद्यकीय प्रतिपुर्ती करीता कोणतीही अडचण निर्माण होणार नाही .

आजार निहाय सविस्तर खाजगी रुग्णालयांची यादी खालील प्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment