Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Important Government Corrigendum regarding Teacher Eligibility Test ] : शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात शालेय शिक्षण विभाग मार्फत दिनांक 03.12.2014 रोजी महत्वपुर्ण शासन शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार शिक्षक पात्रता परीक्षाची कार्यपद्धती निश्चित करणेबाबत तसेच बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम , 2009 अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षक करीता ( इयत्ता 1 ली ते 8 वी सर्व व्यवस्थापन ) यांना टीईटी परीक्षा अनिवार्यता बाबत शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत .
यानुसार नमुद करण्यात आले आहेत कि, शिक्षक पात्रता परीक्ष मध्ये कनिष्ठ प्राथमिक गट यांमध्ये इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यंत व वरिष्ठ प्राथमिक यांमध्ये इयत्ता 6 वी ते 8 वी असे दोन गट करीता शिक्षकांची प्रत्येकी 01 स्वतंत्र प्रश्नपत्रिका असणार आहे .
तर इयत्ता 6 वी ते इयत्ता 8 वी या गट करीता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारास इयत्ता पहिली ते 5 वी गट करीता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार नाही . असे नमुद करण्यात आले आहेत .
या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहणार नाही : यांमध्ये शारीरिक शिक्षण , कार्यानुभव , कला , संगित या विषयांच्या पदविका व पदवीधर शिक्षक यांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असणार नाही असे शासन शुद्धीपत्रक काढण्यात आले आहेत .
