Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Historic decision to increase DA by 58% for these state employees/pensioners on the lines of the Centre ] : केंद्र सरकारच्या धर्तीवर खाली नमुद राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना 58 टक्के दराने डी.ए वाढ लागु करणेबाबतचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे .
केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना दि.01.07.2025 पासुन डी.ए मध्ये 03 टक्केची वाढ लागु केल्याने , एकुण महागाई भत्ता हा 55 टक्के वरुन 58 टक्के इतका झाला आहे .
या राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचा ऐतिहासिक निर्णय : छत्तीसगड राज्याचे राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना माहे जुलै 2025 पासुन 55 टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागु करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे .
दि.11 जानेवारी रोजी छत्तीसगड राज्य कर्मचारी संघटनेचे 8 वे राज्य अधिवेशन पार पाडले , या अधिवेशनास छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री विष्णू देव उपस्थित होते , त्यांनी या सभेत डी.ए वाढीची अधिकृत्त घोषणा केली .
तसेच केंद्र सरकारच्या धर्तीवर इतर देय भत्ते देण्याचे आश्वासन देण्यात आले आहेत . यामुळे छत्तीसगड राज्याचे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर इतर वाढीव भत्तेचा लाभ अनुज्ञेय होणार आहेत . ( उदा. वाहन भत्ता , घरभाडे भत्ता , महागाई भत्ता इ.)
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीचा लाभ पुढच्या महिन्यात : महाराष्ट्रात सध्या महानगरपालिका निवडणूक सुरु आहे , यामुळे डी.ए वाढीचा निर्णय या महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात डी.ए वाढीची अधिकृत्त संभावना आहे .यामुळे पुढच्या महिन्यात प्रत्यक्ष डी.ए वाढ अनुज्ञेय होईल .