राज्य शासन सेवेतील सरकारी / निमसरकारी ,मंडळे , कंत्राटी / बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण मार्गदर्शक सुचना GR.

Maha.school  संगिता पवार प्रतिनिधी [ Important guidelines for government/semi-government, board, contract/outsourced employees in state government services GR. ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सरकारी / निमसरकारी , मंडळे , कंत्राटी / बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण मार्गदर्शक सुचना देणारा सा.प्र.विभा मार्फत दि.28.07.2025 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर मार्गदर्शक सुचनांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्यातील सरकारी / निमसरकारी ,मंडळे , कंत्राटी / बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांनी सोशल मिडीया वापर करताना काही महत्वपुर्ण सुचना देण्यात आलेले आहेत .

यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि, कर्मचारी सरकारच्या धोरणांवर अथवा कृतीवर कोणत्याही प्रकारची टीका करु नये , कारण कर्मचारी हा शासनांचे अविभज्य भाग आहे . तसेच सोशल मिडीया अत्यंत जाणीवपुर्वक व जबाबदारीने हाताळण्याचे निर्देश आहेत .

तसेच सरकारी सोशल मिडीया खाते व आपले वैयक्तिक सोशल मिडीया खाते हे स्वतंत्र ठेवण्याचे निर्देश आहेत . याशिवाय सरकारने बंदी घातलेल्या ॲप , वेबसाईटचा वापर न करण्याचे निर्देश आहेत . सरकारच्या मान्यतेने सरकारी योजना , उपक्रम इ.प्रचार , प्रसार करीता सरकारी अधिकृत्त माध्यमांचा वापर करण्याचे निर्देश आहेत .

कार्यालय अंतर्गत संपर्क / समन्वय साधणे करीता सोशल मिडीया प्लॅटफॉर्म ( टेलिग्राम , व्हॉट्सॲप इ. ) चा वापर करता येणार आहे . अधिकारी / कर्मचाऱ्यांची स्वयंप्रशंसा होणार नाही , अशा प्रकारच्या सोशल मिडीयावर पोस्ट करावेत .

टीप : सध्या सोशल मिडीयावर आपल्या पदनामाचा लोगो , वर्दी / गणवेश त्याचबरोबर फोटो , रिल्स / व्हिडीओ , वाहनांवर विभागाचे नाव इ . बाबी मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर शेअर केले जात आहेत . अशा बाबी अपलोड न करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

Leave a Comment