Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major decisions regarding state employees such as salary differential, promotion, advance allocation, final seniority list, grants. Dated 12.01.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 12.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.सातवा वेतन आयोग फरक : मुकबधीर या प्रवर्ग मध्ये कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहायक अनुदाने ( वेतन ) निधी वितरण करणेबाबत निर्णय निर्गमित करण्यात आला आहे , तसेच पडसाद अपंग उपचार व पूनर्वसन केंद्र संचलित पडसाद कर्णबधीर विद्यालय कर्णबधीर विद्यालय , सिडको जि.नाशिक यांचा सातवावेतन आयोग फरक अदा करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
02.पदोन्नती : निवासी आयुक्त व सचिव महाराष्ट्र सदन , नवी दिल्ली यांच्या आस्थापनरील कार्यरत वरिष्ठ सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब ( अराजपत्रित ) संवर्गातुन व्यवस्थापक गट ब ( राजपत्रित ) या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे .
03.अग्रिम वाटप : विधी व न्याय विभागाच्या दिनांक 12.01.2025 रोजीच्या निर्णयानुसार , सरकारी कर्मचारी इ.कर्जे , मोटार वाहन खरेदी अग्रिमे , नविन मोटार सायकल / स्कुटर खरेदी अग्रिम वाटप इ. अग्रिमे वाटप करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे .
04.अंतिम सेवाज्येष्ठतासुची : महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा , गट अ मधील विशेषज्ञ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदाची दिनांक 01.01.2025 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची यादी निर्गमित करण्यात आलेली आहे .
05.वेतन आयोग फरक : अंध या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने ( वेतन ) निधी वितरण करणेबाबत , अंध विद्यालय बोधडी ता.किनवट जि.नांदेड यांना वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
या संदर्भातील वरील 05 शासन निर्णय डाऊनलोड ( PDF ) करण्यासाठी Click here