उद्या 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती निमित्ताने या विभाग / कार्यालयांना सुट्टी जाहीर ; पहा सविस्तर परिपत्रक .

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Holiday declared for these departments/offices on the occasion of Makar Sankranti tomorrow, January 14th ] : दिनांक 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे , या निमित्ताने सर्वच विभागांना सार्वजनिक सुट्टी नाही . तर ज्या विभागांने / कार्यालयांने सुट्टी जाहीर केली आहे . फक्त त्यांनाच सुट्टी असणार आहे .

महाराष्ट्र राज्य सार्वजनिक सुट्टीच्या यादीमध्ये दिनांक 14 जानेवारी मकर संक्रांतीची सार्वजनिक सुट्टी नमुद नाही . यामुळे राज्यातील सर्वच कार्यालयांना अधिकृत्त सुट्टी असणार नाही .खाली नमुद कार्यालयांना सुट्टी असेल .

आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यरत आश्रमशाळा : महाराष्ट्र राज्याच्या अधिनस्त कार्यरत आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांना उद्या दि.14 जानेवारी रोजी मकर संक्रांती निमित्ताने सुट्टी असणार आहे .

जिल्हा परिषद गडचिरोली : जिल्हा परिषद अधिनस्त शाळांना मकर संक्रांती सणाच्या निमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करणेबाबत शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्यामार्फत दि.12.01.2026 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

जिल्हा परिषद सांगली : जिल्हा परिषद सांगली अंतर्गत येणाऱ्या सर्व कन्नड व मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळांना दि.14 जानेवारी मकर संक्रांती सणाच्या निमित्ताने सुट्टी जाहरी करणेबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहेत .

महानगपालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी : महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये दि.15 जानेवारी रोजी निवडणुक असल्याने , सदर शाळेवर मतदन केंद्र असल्याने याशिवाय सर्व शिक्षक देखिल निवडणूक कामकाज निमित्ताने कर्तव्यावर कार्यरत असल्याने , 14 जानेवारी रोजी पालिका क्षेत्रातील शाळांना अनौपचारिक रित्या सुट्टी असणार आहे .

बँकांना सुट्टी आहे का ? : मकर संक्रांती सणाच्या निमित्ताने बँकांना दि.14 जानेवारी रोजी सुट्टी असणार नाही .

Leave a Comment