राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.13 जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आले 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ 07 major government decisions (GR) were issued on January 13 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी 07 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .

01.जुनी पेन्शन योजना : राज्याची परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागु असणाऱ्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थाद्वारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील 100% अनुदानित आश्रमशाळांमधील 100% अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली लागु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

02.दिव्यांग कल्याण विभाग : मुकबधीर या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहायक अनुदाने ( वेतन ) निधी वितरण करणेबाबत आधार मूकबधीर विद्यालय , इंदिरानगर बिबवेवाडी पुणे ( वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ) देणेबाबत मंजुरी देण्यात आली आहे .

03.वेतन अनुदान : माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतन करीता निधी उपलब्ध करुन देण्यास अनुदान वितरण करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे .

04.अल्पसंख्याक विकास विभाग : अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्थेत 11 पदे निर्माण मंजुरी देणेबाबत अल्पसंख्याक विकास विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे .

05.उद्योग , उर्जा व कामगार विभाग : दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक 2025-26 करीता मतदार संघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .

06.तंत्रशिक्षण विभाग : तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट अ या सेवेतील प्राचार्य , शासकीय तंत्रनिकेतन या पदावरील अधिकाऱ्यांची दिनांक 01.01.2011 ते दि.01.01.2025 या कालावधीत अंतिम ज्येष्ठता सुची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .

07.कृषी व पदुम विभाग : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठास सन 2025-26 या आर्थिक वर्षात सहायक अनुदाने ( वेतनेतर ) करीता अनुदान वितरीत करणेबाबत मंजूरी देण्यात आली आहे .

या संदर्भातील सर्व शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

आपण सरकारी / निमसरकारी कर्मचारी असला तर कर्मचारी विषयक नियमित अपडेट साठी खालील whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा .

Leave a Comment