Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Schools will remain closed on January 14, 15, 16 and 18. ] : दिनांक 14 ते 16 व 18 जानेवारी 2026 पर्यंत राज्यातील शाळांना सुट्टी असणार आहे . या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
दि.14 जानेवारी : दिनांक 14 जानेवारी रोजी मकर संक्रांती सणाच्या निमित्ताने शाळांना सुट्टी असणार आहे . पंरतु महानगरपालिका निवडणुक कामी निमित्त शिक्षक / कर्मचाऱ्यांना मात्र निवडणूकीच्या ठिकाणी सर्व साहित्य सोबत हजर रहावे लागेल .
15 जानेवारी : 15 जानेवारी रोजी राज्यातील महानगरपालिका निवडणूक असल्याने , सर्व महानगरपालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी असणार आहे .
16 जानेवारी : दिनांक 15 जानेवारी निवडणूक कर्तव्यार्थ शिक्षकांना निवडणुकीनंतर पुढील दिवशी म्हणजेच दिनांक 16 जानेवारी सुट्टी असते , यामुळे ज्या शाळेवर निवडणुक कर्तव्यार्थ शिक्षक व्यतिरिक्त इतर शिक्षक उपलब्ध नसेल अशा शाळा बंदच राहतील .
18 जानेवारी : दिनांक 18 जानेवारी रोजी रविवार असल्याने शाळा नियमित सुट्टी राहील .
आपण सरकारी / निमसरकारी कर्मचारी असला तर कर्मचारी विषयक नियमित अपडेट साठी खालील whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा .
