सेवा जोडून निवृत्तीवेतनाचे लाभ देणेबाबत वित्त विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय !

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ A very important government decision by the Finance Department regarding providing pension benefits by linking service. ]: सेवा जोडून निवृत्तीवेतनाचे लाभ अदा करणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.18.08.2009 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , वित्त विभागाच्या दि.31.10.2005 रोजीच्या निर्णयानुसार राज्य शासन सेवेत दि.01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांकरीता नविन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागु केली आहे .

या योजनेच्या अनुषंगाने निर्गमित करण्यात आलेली वित्त विभागाचे दिनांक 24.02.2009 व दि.16.07.2009 रोजीची परिपत्रके रद्द करण्यात येत आहेत .तसेच दि.01.11.2005 पुर्वी शासन सेवेत निवृत्तीवेतनार्ह आस्थापनेवर कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांने त्याच अथवा ..

अन्य विभागातील निवृत्तीवेतनार्ह आस्थापनेच्या पदावर नियुक्तीकरीता दि.01.11.2005 पुर्वी अथवा त्यानंतर आवेदन केला असेल व त्याला दि.01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर सेवेत पदावर नियुक्त करण्यात आले असेल तर अशा प्रकरणी सदर कर्मचाऱ्यांस भविष्य निर्वाह निधी योजना लागु ठरेल .

तर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियमांचे पुर्तता सदर प्रकरणी होत नसेल तर त्यास नविन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनाच देय ठरेल , असे नमुद करण्यात आले आहेत .

सदर निर्णय योग्य त्या फेरफारासह राज्यातील जिल्हा परिषदा ,अनुदानित विद्यापीठे , शैक्षणिक संस्था , कृषित्तर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असणारी अशासकीय महाविद्यालये यांना लागु ठरेल .

💁 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नियमित अपडेट देणारे यूट्यूब (Youtube) चॅनेलला सबस्क्राईब ( subscribe ) करण्यासाठी Click Here

Leave a Comment