राज्य शासन सेवेतुन निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा सन्मानपुर्वक निर्णय ; शासन निर्णय निर्गमित दि.14.01.2026

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ A highly respectful decision for employees retiring from state government service. ] : राज्य शासन सेवेतुन निवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासन विभाग मार्फत मोठा सन्मानपुर्वक निर्णय घेण्यात आला आहे . या संदर्भात सामान्य प्रशासन विभाग मार्फत दि.14.01.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , दरवर्षी / स्वेच्छा सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवेच्या योगदानाबद्दल आठवण म्हणून महत्वपुर्ण निर्णय घेतला आहे .

यामध्ये त्यांस सेवेच्या योगदानाबद्दल एक स्मृतिचिन्ह प्रदान करण्याकरीता मान्यता देण्यात आली आहे . याकरीता आवश्यकतानुसार स्मृतीचिन्ह खरेदी करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे . तसेच सदर खरेदी करण्यात येणाऱ्या स्मृतीचिन्हाच्या खर्चाबाबत ..

वित्त विभागाच्या निर्णयानुसार मंजूरी देण्यात येत आहे . यामुळे राज्य शासन सेवेतुन निवृत्त होणाऱ्या / तसेच स्वेच्छा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीस त्यास स्मृतीचिन्ह देवून सन्मानित केले जाणार आहेत .

सदर स्मृतीचिन्ह सदर कर्मचाऱ्यांस त्याच्या सेवेची आठवण राहील म्हणून , सदर उपक्रम राज्य शासनांकडून राबविण्यात येत आहे .

आपण सरकारी / निमसरकारी कर्मचारी असला तर कर्मचारी विषयक नियमित अपडेट साठी खालील whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा .

Leave a Comment