Maha. school संगीता पवार प्रतिनिधी [ state employee mahagai bhatta vadh update ] : राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जुलै 2025 पासून 03 टक्के महागाई भत्ता (mahagai bhatta ) वाढ संदर्भात आताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे .
केंद्र सरकारने दिनांक 01 जुलै 2025 पासून केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना 03 टक्के महागाई भत्ता (DA) वाढ लागू केल्याने एकूण महागाई भत्ता हा 55% वरून 58% इतका झाला आहे . याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना 58% दराने DA वाढ लागू करण्यात आलेली आहे .
त्या संदर्भात राज्य सरकारकडून अधिकृत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . परंतु राज्य शासन सेवेतील इतर सर्व पात्र सरकारी , निमसरकारी (जिल्हा परिषद) त्याचबरोबर पेन्शनधारकांना महागाई भत्ता (DA ) वाढ अद्याप बाकी आहे .
प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील सरकारी , निमसरकारी (जिल्हा परिषद) , त्याचबरोबर पेन्शन धारक यांना माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी वेतन / पेन्शन देयकासोबत DA वाढ लागू केली जाणार आहे.
या संदर्भात अधिकृत शासन निर्णय (GR) या महिन्याच्या अखेर निर्गमित करण्यात येणार असल्याची शक्यता सूत्रानुसार समोर येत आहे . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना या महिन्याच्या वेतन / पेन्शन सोबत मोठा आर्थिक लाभ मिळेल .