Maha.School प्रणिता पवार प्रतिनिधी [ Mahabharti for 11000+ posts of teachers in local government schools in the state. ] : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवरील शाळांवर शिक्षकांच्या तब्बल 11000+ रिक्त जागेसांठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . याबाबत शालेय शिक्षण विभागांकडून अधिकृत्त वृत्त समोर आले आहे .
प्राप्त माहितीनुसार शालेय शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था यांमध्ये नगरपालिका , महानगरपालिका , नगरपंचायत अंतर्गत कार्यरत शाळांवर शिक्षकांच्या 11000+ जागा रिक्त आहेत . सदर पदांवर तातडीने पदभरती करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभाग मार्फत घेण्यात आला आहे .
टेट – 2025 गुणांच्या आधारे पदभरती : शिक्षक अभियोग्यता चाचणी 2025 परीक्षा निकालाच्या आधारावर सदर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .
मे 2026 पर्यंतच्या रिक्त पदांचा विचार : यांमध्ये माहे मे 2026 पर्यंतच्या रिक्त पदांचा विचार करुन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तब्बल 11000+ शिक्षकांचे पदे रिक्त आहेत . तर माहे मे 2026 पर्यंत अनेक शिक्षक सेवानिवृत्त होत आहेत . यामुळे रिक्त पदांचा आकडा वाढणार असल्याने सदर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
पदभरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातुन : सदर पदभरती प्रक्रिया राबविण्याकरीता सध्या पवित्र पोर्टलवर नोंदणी सुरु करण्यात आली आहे . सदर पोर्टलच्या आधारावर सदर पदभरती प्रक्रीया राबविण्यात येणार आहे .