Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ An important government resolution regarding providing financial assistance to employees’ children at all levels of education (from 1st grade to postgraduate level) at prescribed rates. ] : कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या सर्व स्तरावर ( 1 ली ते पदव्युत्तर स्तर पर्यंत ) विहित दराने अर्थसहाय्य करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दि.16.03.2021 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार दि.19.08.1995 रोजीच्या निर्णयांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे . यानुसार राज्यातील अनुदानित माध्यमिक / उच्च माध्यमिक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या सर्व स्तरावर इयत्ता 1 ली ते पदव्युत्तर पदवी स्तर पर्यत विहीत दराने शैखणिक अर्थसहाय्य केले जाते .
कोण-कोणत्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल ? : यांमध्ये राज्यातील सरकारी / स्थानिक संस्थांच्या शाळेत अथवा मान्यताप्राप्त व अनुदानित शाळेत कार्यरत असणाऱ्या पुर्णवेळ शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणांसाठी अर्थसहाय्यास पात्र असतील .
अटी / शर्ती : यांमध्ये कर्मचाऱ्यांचे कोणतीही उत्पन्न मर्यादा लक्षात घेतली जात नाही , तर फक्त 02 अपत्यांना या नियमांखाली अर्थसहाय्य घेता येईल . सदर अर्थसहाय्य हे ज्या शिक्षण अभ्यासक्रमांमध्ये कालावधी हा 3 तासांपेक्षा कमी आहे व अर्धवेळ अभ्यासक्रम आहे अश अभ्यासक्रमांसाठी अर्थसहाय्य अनुज्ञेय नाही .
आवश्यक प्रमाणपत्र : मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी सदर कर्मचारी हा पुर्णवेळ माध्यमिक , उच्च माध्यमिक शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी असल्याबाबतचे नोकरीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल .
अभ्यासक्रम निहाय पाल्यांना शिक्षणांसाठी देण्यात येणारे अर्थसहाय्य :
| अ.क्र | अभ्यासक्रम | अर्थसहाय्य |
| 01. | अभियांत्रिकी , तंत्रशास्त्र , वास्तुशास्त्र | 4000/- |
| 02. | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय | 6000/- |
| 03. | औषध निमार्ण शास्त्र | 3000/- |
| 04. | शासकीय दंत महाविद्यालय | 4000/- |
| 05. | शासकीय आयुर्वेद महाविद्यालय | 3000/- |
| 06. | खाजगी आयुर्वेद महाविद्यालय | 3000/- |
| 07. | होमियोपॅथी महाविद्यालय | 3000/- |
| 08. | बी.एड.कॉलेज | 8000/- |
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..