सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भ्रमणध्यनी ( मोबाईल ) वापराच्या शिष्टाचाराबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding the etiquette of using mobile phones by employees in government offices. ] : सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या भ्रमणध्वनी वापराच्या शिष्टाचाराबाबत सा.प्र.विभाग मार्फत दि.23.07.2021 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , कार्यालयीन कामकाज करीता दुरध्वनीचा वापर करत असताना , कार्यालयांमध्ये असणाऱ्या दुरध्वनीचा वापर केला जावा . तसेच आवश्यक असेल तेव्हांच भ्रमणध्वनीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

त्याचबरोबर भ्रमणध्वनीवर बोलत असताना , सौजन्यपुर्ण भाषेचा वापर करण्यात यावा , तसेच बोलताना कोणत्याही प्रकारचा वाद घालु नये व असंसदीय भाषेचा वापर करण्यात येवू नये असे नमुद करण्यात आले आहेत .

बोलत असताना सौम्य बोलावते , तसेच बोलत असताना , लघुसंदेशाचा वापर करावा , व मोबाईल फोनवर बोलताना कमीत कमी वेळेमध्ये संवाद साधावा , अशी बाब नमुद करण्यात आलेली आहे .

भ्रमणध्वनी व्यस्त असताना जर प्राप्त लोकप्रतिनिधी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कॉल्सना तात्काळ उत्तरे देण्याचे निर्देश आहेत . जर अत्यावश्यक वैयक्तिक दुरध्वनी कक्षाचे बाहेर जावून बोलण्याचे निर्देश आहेत .

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कक्षात किंवा बैठकीदरम्यान असताना आपला भ्रमणध्वनी हा सायलेंट मोबाईलवर ठेवण्याचे निर्देश आहेत . सदर बैठकीदरम्यान मोबाईलवर संदेश तपासणे , भ्रमणध्वनी तपासणे , इयर फोन वापरणे इ. बाबी टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

कार्यालयीन कामकाज दौऱ्यावर असताना भ्रमणध्वनी बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

Leave a Comment