फक्त याच शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) मधुन मिळणार सुट ; नविन परिपत्रक निर्गमित दि.13.01.2026

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Only these teachers will get exemption from Teacher Eligibility Test (TET); New circular issued on 13.01.2026 ] : शिक्षक पात्रता परीक्षा मधुन फक्त काही शिक्षकांनाच सुट दिली जाणार आहे , याकरीता राज्य शासनांकडून सविस्तर माहिती मागविण्यात येत आहे .

राज्य शासनांच्या दि.13.01.2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार  शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यता मधून सुट देणेकामी विहीत नमुन्यांमध्ये माहिती मागविण्यात आलेली आहे .

यांमध्ये शिक्षकांच्या वयोगट नुसार माहिती मागविण्यात आलेली आहे .यांमध्ये स्पष्ट नमुद करण्यात आले आहेत कि , सन 2011 पुर्वी शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांची व त्यानंतर रुजु झालेल्या शिक्षकांची स्वतंत्ररित्या माहिती मागविण्यात आलेली आहे .

म्हणजेच ज्या शिक्षकांची नियुक्ती ही राष्ट्रीय बालहक्क शिक्षण कायदा निर्गमित झाल्याच्या नंतर झालेली आहे , त्यांना शिक्षक पात्रता परिक्षा द्यावीच लागणार आहे .

या शिक्षकांना मिळणार सुट : ज्या शिक्षकांची नियुक्ती ही सन 2011 पुर्वी म्हणजेच राष्ट्रीय बालहक्क शिक्षण कायदा पुर्वी नियुक्ती झालेली आहे . अशा शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा मधून सुट मिळण्याची शक्यता आहे .

Leave a Comment