Maha. school संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state class C & D post Mahabharati] : महाराष्ट्र राज्य नगर परिषद अंतर्गत गट क व ड संवर्गातील तब्बल 3720 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे .
राज्यातील नगरपरिषद अंतर्गत पदभरती संदर्भात नगर विकास विभाग मार्फत दिनांक 9 जानेवारी 2026 रोजी महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकानुसार संबंधित विभाग प्रमुख यांना पदभरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे .
रिक्त पदांची नावे : यामध्ये लिपिक , वरिष्ठ लिपिक , लेखापाल , सांख्यिकीय अधिकारी , प्रशासकीय अधिकारी , अभियंता , कर निर्धारण अधिकारी , अग्निशमन अधिकारी , स्वच्छता निरीक्षक , शिपाई , चौकीदार , अग्निशमन जवान इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
यामध्ये स्थायी रिक्त पदावर वरील नमूद पदे भरली जाणार आहेत . यामुळे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याकरिता ही मोठी संधी असणार आहे .
परीक्षा पद्धत : सदर नगरपरिषद अंतर्गत घेण्यात येणारी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने TCS / IBPS मार्फत घेतली जाणार आहे .

