Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Types of pension ] : निवृत्तीवेतनाचे प्रकार किती आहेत , याबाबत सविस्तर माहिती या लेखांमध्ये सविस्तर पणे जाणून घेवूयात .
01.नियम वयोमानानुसार निवृत्तीवेतन : महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 नुसार राज्यातील सरकारी कर्मचारी यांध्ये वर्ग – 04 कर्मचारी वगळता निवृत्तीचे वय हे 58 वर्षे तर वर्ग 4 ( चतुर्थ श्रेणी ) कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षे पुर्ण केल्याच्या नंतर सदर निवृत्तीवेतन लागु होते .
2)पुणेसेवा निवृत्तीवेतन : पुर्ण सेवा निवृत्तीवेतन म्हणजे , वरील नियत वयोमानानुसार निवृत्तीवेतन पुर्ण होण्यापुर्वीच नियम 10(४) नुसार अथवा 65 (i) नुसार पुर्णसेवा निवृत्तीवेतन प्राप्त करु शकेल . याकरीता सदर कर्मचाऱ्यांची अर्हताकारी 20 वर्षाची सेवा पुर्ण होणे आवश्यक असेल , व 03 महिने पुर्वी सरकारकडे स्वेच्छानिवृत्ती नोटीस देवून सदर पुर्ण सेवा निवृत्तीवेतन घेवू शकेल .
03.रुग्णता निवृत्तीवेतन : नियम 68 व 80 नुसार सदर रुग्णता निवृत्तीवेतन लागु होते . यानुसार सरकारी कर्मचारी कर्तव्य पार पडत असताना , त्यास शारीरिक अथवा मानसिक रित्या असमर्थ ठरल्यास अशा वेळी प्रपत्र 72 मध्ये दिलेल्या नियमानुसार रुग्णता निवृततीवेतन घेता येते .
04.भरपाई निवृत्तीवेतन : नियम 81 व 84 नुसार सरकारी कर्मचारी स्थायी पदांवर कार्यरत असताना सदर पदे हे नाहीसे केल्याने सदर पदाचे कर्तव्य कायमचे बदलले असल्यास व त्यास इतर पदांवर समायोजित न केल्यास किंवा दुसऱ्या पदांवर समायोजनास कर्मचाऱ्याने नकार दिल्यास अशा प्रकरणी भरपाई निवृत्तीवेतन स्वरुपात निवृत्तीवेतन दिली जाते .
05.सक्तीची निवृत्तीवेतन : शासकीय सेवेत असताना केलेल्या गैरवर्तवणूक तसेच नादारी बाबत कर्मचाऱ्यांस सक्तीने सेवेतून काढून टाकल्यास अशा वेळी सक्तीने सेवानिवृत्तीवेतन अदा केली जाते .
06.अनुकंपा निवृत्तीवेतन : बडतर्फ कर्मचारी निवृत्तीवेतन व उपदान याकरीता पात्र नाही , पंरतु गैरवर्तवणूक तसेच नादारी या करणास्तव सरकारी सेवेतून काढून टाकण्यात आलेल्या किंवा सेवानिवृत्त होण्यास भाग पाडण्यात आलेल्या पुर्णसेवा पात्र किंवा नियम वयोमान निवृत्तीवेतनास पात्र होण्यापुर्वीच अकार्यक्षमतेच्या कारणास्तव सदर कर्मचाऱ्यांस सरकारी सेवेतून काढून टाकल्यास सदर प्रकरणी अनुकंपा निवृत्तीवेतन दिली जाते .