पदोन्नती नाकारल्यास सेवेत होणारे परिणाम व त्याबाबत अवलंबण्याची कार्यवाही बाबत GR

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ GR regarding the consequences in service of denial of promotion and the action to be taken in this regard ] :   पदोन्नती नाकारल्यास सेवेत अनेक परिणाम होवू शकतात याकरीता अवलंबण्याची कार्यवाही बाबत राज्य शासनांच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 12.09.2016 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करुन अवलंबण्याची कार्यवाही नमुद करण्यात आलेली आहे .

पदोन्नती जर नाकारली तर प्रथमत : सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सदर पदोन्नती यादी मधून नाव काढण्यात येते व पुढील 02 वर्षे सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या नावाचा विचार न करता तिसऱ्या वर्षी पदोन्नती करीता विचार केला जातो .

तसेच पदोन्नती नाकारल्यास पुढील कोणत्याही निवड सुचीकरीता सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात येत नाही . तसेच पदोन्नती नाकारुन 02 वर्षे नंतर तिसऱ्या वर्षी सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव पदोन्नती यादीत आल्यास ..

व दुसऱ्यांदा देखिल सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांने पदोन्नती घेण्यास नकार दिल्यास , पुन्हा पुढील 02 वर्षे त्याचे नाव पदोन्नती यादीमधून वगळण्यात येईल . असेच प्रत्येक वेळी कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत .

आश्वासित प्रगती योजना : पदोन्नती नाकारल्यास , सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांने आश्वासित प्रगती योजनेचा लाभ दिला असेल अशा प्रकरणी सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांचे सदर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ काढून घेण्याचे निर्देश आहेत .

पदोन्नती नाकाल्यास सदर पदोन्नती पदावर पदोन्नती देण्यासाठी कनिष्ठ अधिकारी / कर्मचाऱ्यांचा निवडसूचीत समावेश करण्याचे निर्देश आहेत . या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here

Leave a Comment