Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Advance: State employees get a medical advance of Rs. 1.5 lakh for the treatment of these 05 diseases. ] : राज्य कर्मचाऱ्यांना विविध प्रयोजन करीता अग्रिम देण्याची तरतुद आहे , यापैकी वैद्यकीय कारणास्तव 1.5 लाख रुपये पर्यंत वैद्यकीय अग्रिम ( Advance ) देण्याची तरतुद आहे .
या संदर्भात राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दि.10.02.2006 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित आहे . यानुसार राज्य कर्मचाऱ्यांना खाली नमुद 05 आजाराच्या शस्त्रक्रियाच्या उपचार करीता 1.5 लाख रुपये पर्यंत वैद्यकीय अग्रिम मिळते .शस्त्रक्रिया आजाराची यादी पुढीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | आजराचे नाव |
| 01. | हृदय शस्त्रक्रियांची प्रकरण |
| 02. | हृदय उपमार्ग शस्त्रक्रिया |
| 03. | ॲन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया |
| 04. | मुत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रिया |
| 05. | रक्ताचा कर्करोग |
वरील नमुद 05 आजारांच्या शस्त्रक्रिया करीता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 1.5 लाख रुपये पर्यंत वैद्यकीय अग्रिम देण्याची तरतुद आहे . याकरीता आपल्या कार्यालयास विहीत नमुन्यात अर्ज सादर करावे लागेल .
याशिवाय शस्त्रक्रिया करीता लागणारा अंदाजित खर्च संबंधित रुग्णालयाचे सदर अर्जासोबत जोडावे लागेल . सदर उपचार हे शासनमान्य खाजगी रुग्णालयांमध्ये करणे आवश्यक असेल .