Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ After the Central directive, the State Government finally issued a circular regarding the Teacher Eligibility Test (TET). ] : केंद्र सरकारने राज्यातील सर्व सचिवांना पत्र सादर करुन राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्यता संदर्भात माहिती उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आले होते .
त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्या मार्फत राज्य सरकारच्या पत्र क्र.1125 दि.07.01.2026 रोजीच्या संदर्भिय पत्रानुसार राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषदा सर्व यांच्याप्रति परिपत्रक सादर करण्यात आले आहेत .
सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , शिक्षक पात्रता परिक्षा ( टीईटी ) अनिवार्यता संदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 01 सप्टेंबर 2025 रोजी पारित केलेल्य न्याय निर्देशानुसार खाली नमुद नमुन्यात माहिती मागविण्यात आलेली आहे .
सदर माहिती ही शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावरुन प्रमाणित करुन सरकारला सत्वर सादर करावयाची असल्याने दिनांक 16.01.2026 पर्यंत सदर माहिती विनाविलंब सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
सदर माहितीमध्ये वयोगट निहाय शिक्षकांची संख्या , सन 2011 पुर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांची संख्या , सन 2011 नंतर नियुक्त शिक्षकांची संख्या , सन 2011 नंतर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होवून नियुक्त शिक्षकांची संख्या , 1 ली ते 05 वी पर्यंतच्या व 6 वी ते 08 वी पर्यंत शिक्षकविणाऱ्या शिक्षकांची संख्या ..
अशी माहिती विहीत नमुन्यात मागविण्यात आलेली आहे .सदर माहिती केंद्राकडे सादर केल्याच्या नंतर केंद्र सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयांमध्ये पाठपुरावा केला जाणार आहे .

