Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Benefits of the Revised Assured Progress Scheme under the three services as per the Seventh Pay Commission. ] : सातवा वेतन आयोगानुसार सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे तीन लाभ देणेसंदर्भात वित्त विभाग मार्फत दि.02.03.2019 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे , सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
7 वा वेतन आयोग नुसार नियमित सेवेच्या 10,20 व 30 वर्षांच्या सेवेनंतर तीन सेवांतर्गत प्रगती योजनेचे लाभ दि.01.01.2016 पासुन लागु करण्यात आले आहेत . यांमध्ये एस – 20 पेक्षा अधिक वेतन घेणाऱ्यांना सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही .
सदर योजनेनुसार सेवेत किमान 03 वेळा सदर योजनेचा लाभ मंजूर करता येणार आहे . जर दोन कार्यात्मक पदोन्नत्या मिळाल्या असतील तर त्यास केवळ एकच लाभ देता येणार आहे . एकंदरित पदोन्नती न मिळालेल्या / पदोन्नती नसणाऱ्या पदांवरील पात्र अधिकारी / कर्मचाऱ्यांकरीता सदर आश्वासित प्रगती योजना अंमलात आणली आहे .
यांमध्ये दि.01.01.2016 पुर्वी ज्यांना 12 पहिला लाभ प्राप्त झाला असेल अशा प्रकरण त्यास पुढील 08 वर्षानंतर दुसरा तर पुढील 10 वर्षानंतर तिसरा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे . तसेच 24 वर्षानंतर दुसरा लाभ दिला गेला असेल तर दुसऱ्या लाभापासून 06 वर्षाच्या सेवेनंतर ( 24+06 ) तिसरा लाभ अनुज्ञेय करण्याचे निर्देश आहेत .
सातवा वेतन आयोगांमध्ये नियमित सेवेच्या 10 , 20 व 30 वर्षांच्या नियमित सेवेनंतर पदोन्नतीची वेतनश्रेणी अथवा एकाकी पदासाठी वेतनस्तर मधील पुढील वेतनश्रेणी अनुज्ञेय असणार आहे .
परंतु पदोन्नती पात्र झाली असेल आणि सदर पात्र अधिकारी / कर्मचारी पदोन्नती नाकारत असेल , अशा प्रकरणी त्यास सदर आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही अथवा सदर लाभ काढून घेण्याचे निर्देश आहेत .
याबाबतचा सविस्तर GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here