Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ These teachers will be exempted from the TET qualification requirement ] : सर्वोच्च न्यायालयाने इयत्ता 01 ली ते 08 वी पर्यंत शिक्षकविणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य केली असली तरी , या विरोधात विविध याचिकांवर एक बाजु अधिक जड आहे , जे कि शिक्षकांना दिलासा देणारी आहे .
अधिकृत्त परीक्षा घेवून भरती झालेल्या शिक्षकांची सुटका होणार : शिक्षक पात्रता परीक्षा ही केवळ पात्रता परीक्षा आहे , तर राज्यातील बऱ्याच विभागांनी शिक्षक भरती करताना अधिकृत्त परीक्षा घेवून शिक्षकांची निवड केली आहे . ही परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षेला समकक्ष परीक्षा ..
मानली जावी , अशी मागणी होत आहे . यानुसार विचार केला असता , तर अनेक शिक्षकांची यांमधून सुटका होणार आहे . जर शिक्षक पदभरती करताना अधिकृत्त परीक्षा घेवूनच निवड प्रक्रिया केली जात आहे , तर पुन्हा टीईटी पात्रता परीक्षा अनिवार्य का ? आणि ..
सदरचा विषय हा राज्य सरकारचा असुनही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अधिकृत्त मानुन राज्य सरकार देखिल अशा प्रकारचे अनिवार्यतेचा निर्णय घेत आहे हे चुकीचे असल्याचे तज्ञांचे मत आहे .
तर उलट राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात लढा दिला पाहीजे असे तज्ञांचे मत आहे . अशा प्रकारच्या अचानक घेण्यात येणाऱ्या निर्णयामुळे शिक्षक अधिक तणावांमध्ये काम करीत आहेत .
यामुळे ज्या शिक्षकांची अधिकृत्त पणे परीक्षा घेवून निवड प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे , अशा शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्यता मधून वगळण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे , या मागणीस राज्य सरकार देखिल सकारात्मक असल्याचे बाब समोर येत आहे .