Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Important circular regarding online transfer process 2026 issued on 02.01.2026 ] : ऑनलाईन बदली प्रक्रिया बाबत ग्रामविकास विभाग मार्फत दि.02.01.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर परिपत्रक हे शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) जिल्हा परिषद सर्व तसेच सर्व जिल्हा परिषदांचे नोडल अधिकारी , मे . विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि.पुणे यांच्या प्रति सादर करण्यात आले आहेत .
यानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हा अंतर्गत तसेच आंतर जिल्हा बदली प्रक्रिया सन 2026 या विषयाच्या अनुषंगाने मा.प्रधान सचिव ( ग्राम विकास विभाग ) यांच्या अध्यक्षतेखाली …
दि.06 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे बैठक आयोजित करण्यात आली . त्या अनुषंगाने सदर बैठकीतस आवश्यक त्या माहिती व कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे विनंती करण्यात आलेली आहे .
सदर परिपत्रकानुसार यंदाच्या बदल्या ह्या विहीत कालावधीमध्ये पार पडणार हे निश्चित आहे .
