Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding House Rent Allowance (HRA) for employees living in rural areas.. ] : ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्ता ( HRA ) बाबत ग्राम विकास विभाग मार्फत दि.09.09.2019 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि, राज्य सरकारच्या वित्त विभाग मार्फत दि.25.04.1988 तसेच दिनांक 05.02.1990 रोजीच्या शासन निर्णयांमध्ये नमुद केल्यानुसार घरभाडे भत्ता मिळविणेकरीता कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे ..
हे स्पष्ट नसल्याने , ग्राम विकास विभागाने दिनांक 05 जुलै 2008 त्याचबरोबर दि.03 नोव्हेंबर 2008 रोजीच्या शासन परिपत्रक वित्त विभागाच्या दिनांक 05 फेब्रुवारी 1990 रोजीच्या निर्णयातील तरतुदीशी अधिक्रमित ठरत नाही .
यामुळेच संबंधित कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता ( HRA ) अनुज्ञेय ठरतो , तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना घरभाडे ( HRA ) देण्याचे मा.न्यायालयाने आदेश पारित केले आहेत . यामुळेच वित्त विभागाच्या दिनांक 07.10.2016 रोजीच्या दिनांक 25 एप्रिल 1988 व दि.05 फेब्रुवारी 1990 रोजीच्या शासन निर्णयांमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात आली आहे .
यानुसार ग्रामीण भागांमध्ये कामाच्या ठिकाणी राहण्याची अट काढून टाकण्यात येत आहे . ही तरतुद वित्त विभागाच्या दिनांक 07 ऑक्टोंबर 2016 रोजीच्या निर्णयानुसार वगळण्यात आलेली आहे .
यामुळे जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपातळीवर कार्यरत ग्रामसेवक , आरोग्य कर्मचारी , शिक्षक , संबंधित कर्मचारी मुख्यालयी राहणे करीता ठोक उपायोजन करणे आवश्यक आहे .
यास्तव ग्राम सेवक , ग्राम विकास अधिकारी , आरोग्य सेवक , आरोग्य सहाय्यक , शिक्षक , मुख्याध्यापक मुख्यालयी असल्यासंबंधी संबंधित ग्रामसभेचा ठराव बंधनकारक आहे . एकंदरित सदर कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्ता अदा करणेकामी ग्रामसभेचा ठराव बंधनकारक असणार आहे .
