Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Pay Commission: The formula for salary hike in the new Pay Commission will be as follows… ] : नविन वेतन आयोगांमध्ये पगारवाढीचा फॉमुला सातवा वेतन आयोगापेक्षा भिन्न असणारी शक्यता आहे .
पगार वाढीकरीता आत्तापर्यंतच्या वेतन आयोगांमध्ये कर्मचाऱ्यांच्या सेवा नुसार वार्षिक पद्धतीने वार्षिक वेतन देण्याची तरतुद आहे . परंतु आता नविन वेतन आयोगांमध्ये यांमध्ये बदल केला जाणार आहे .
केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग समितीचे गठण केले आहे , सदर समितीला काम करण्याची कार्यरेषा नेमुण देण्यात आलेली आहे . यांमध्ये स्पष्ट केले आहे कि , कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता विचारात घेवून , त्या आधारे कर्मचाऱ्यांना मोबदला देण्याची शिफारस करण्याचे निर्देश आहेत .
कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता : यामुळे संबंधित वर्षांमध्ये कर्मचाऱ्यांने नेमुन दिलेल्या कामांमध्ये कमी पडला किंवा पुर्ण करण्यास असमर्थ ठरल्यास , संबंधित प्रमुखाने तसा अहवाल तयार केल्यास पगारवाढ थांबू शकणार आहे .
अतिरिक्त कामाचा मोबदला : जर कर्मचारी अतिरिक्त काम / दुसऱ्या पदाचा किंवा आपल्या उत्तम कार्यक्षमतेचा वापर प्रशासन चालविण्यास करता असल्यास , अशा कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरुपात ( वेतनवाढ , बोनस , अतिरिक्त भत्ते ) मोबदला देण्याची तरतुद केली जाणार आहे .
पगार वाढ करिता परीक्षाची तरतूद : पगार वाढ करणेकामी कर्मचाऱ्यांचे परीक्षांचे आयोजन केले जावू शकेल, या संदर्भात केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑनलाइन स्वरूपातील अभ्यासक्रम पूर्ण करण्याची तरतूद नमूद केली गेली आहे सदर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर परीक्षा घेऊन प्रमाणपत्र देण्याची तरतूद आहे . यामुळे सदर अभ्यासक्रमांच्या आधारे पगारवाढ देण्याची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.