Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Revised government order (GR) regarding the imposition of minor penalties on state government employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांना किरकोळ शिक्षा देणेबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 25.08.2025 रोजी सुधारित शिस्तभंगविषयक शासन निर्णय ( GR) निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांना किरकोळ शिक्षा देण्याकरीता सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात आले आहेत . कर्मचाऱ्यांचे गट व किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम प्राधिकारी पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
| कर्मचारी संवर्ग | किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम प्राधिकारी |
| गट क व ड | कार्यालय प्रमुख |
| गट ब ( राज्यसेवा ) | विभाग प्रमुख / प्रादेशिक विभाग प्रमुख |
| एस – 23 / राज्यसेवा गट अ मधील कर्मचारी | प्रशासकीय विभाग प्रमुख |
| रोजगार हमी योजना मधील गट अ, ब , क व ड संवर्गातील कर्मचारी | विभागीय आयुक्त |
किरकोळ शिक्षा : काही प्रकरणी कर्मचाऱ्यांने केलेल्या शिक्षा ह्या फारसे गंभीर स्वरुपाचे नसल्याने , अशा वेळी त्यांस किरकोळ शिक्षा देय ठरते . अशा प्रकरणी संबंधित शिक्षा निकाली काढण्याकरीता सदर शासन निर्णयानुसार सुधारणा करण्यात आलेली आहे .
महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 मध्ये शिस्त व अपील विषयक नियमावली नमुद करण्यात आलेले आहेत .
