राज्य अधिकारी / कर्मचारी कामानिमित्त बाहेर गेल्यास या दिला जाणारा हॉटेल वास्तव्य भत्ता / दैनिक भत्ता सुधारित दर शासन निर्णय .

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Revised rate of hotel accommodation allowance/daily allowance to be paid to state officers/employees when they go out for work, Government decision. ] : राज्य अधिकारी / कर्मचारी हे कामानिमित्त बाहेर गेल्यास त्यांना वास्तव्य करीता हॉटेल भत्ता व दैनंदिन खर्च करीता दैनिक भत्ता अदा केला जातो .

याबाबत सातवा वेतन आयोगानुसार सुधारित दर बाबत वित्त विभाग मार्फत दि.07.10.2022 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या वेतनस्तर नुसार हॉटेल वास्तव्य भत्ता व भोजन व संकीर्ण खर्च अदा केला जातो .

राज्य अधिकारी / कर्मचा-यांनी कामाच्या निमित्ताने देशातील दिल्ली , मुंबई , कोलकाता , चैन्नई , हैद्राबाद या शहरातील हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यास त्यास पुढीलप्रमाणे हॉटेल वास्तव्य भत्ता व भोजन व संकीर्ण खर्च करीता भत्ता अदा केला जाईल .

वेतनस्तरहॉटेल वास्तव्य देय भत्ताभोजन व संकीर्ण खर्च
एस – 30 व त्यापेक्षा अधिक7500/- रुपये प्रतिदिन1200/- प्रतिदिन पेक्षा अधिक नाही
एस – 25 ते एस – 294500/- रुपये प्रतिदिन1000/- प्रतिदिन पेक्षा जास्त नाही
एस – 20 ते एस – 242250/- रुपये प्रतिदिन800/- रुप्ये प्रतिदिन पेक्षा अधिक नाही
एस -19 व त्यापेक्षा कमी1000/- पर्यंत प्रतिदिन500/- प्रतिदिन पेक्षा अधिक नाही

सदरची प्रतिपुर्ती ही केवळ वरी नमुद करण्यात आलेल्या शहरात सरकारी कामकाज निमित्ताने दौऱ्यावर असताना हॉटेलमध्ये वास्तव्य केल्यासच अनुज्ञेय केला जाईल .

Leave a Comment