Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Senior citizens above 65 years of age will be given an honorarium of Rs. 7,000/- per month. ] : वय वर्षे 65 वर्षे पेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 7,000/- रुपये मानधन देण्याची योजना राज्य सरकारने प्रस्तावीत करण्यात आली आहे .
याशिवाय इतरही आर्थिक लाभ देण्याची तरतुद करणारे विधेयक दि.15.07.2025 रोजी राज्याचे विधानमंडळांमध्ये सादर करण्यात आले होते . या विधेयकास लवकरच मंजुरी दिली जाणार आहे . यामुळे सदर विधेयकातील सर्व तरतुदी लागु केल्या जाणार आहेत .
सदर विधेयक हे राज्यातील ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी विविध आर्थिक व सामाजिक लाभ मिळावेत , व त्यांना हक्काने जगता यावेत याकरीता तयार करण्यात आले आहेत . सदर विधेयकाच्या मंजूरीकरीता यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतुद केली जावू शकेल .
विधेयकातील तरतुदी : वय वर्षे 65 व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या राज्यातील ज्येष्ठ नागरिक यांना दरमहा 7,000/- रुपये मानधन देण्याची तरतुद आहे . तसेच आजारी पडल्यास रुपये 5 लाख रुपये पर्यंत सरकारी / निमसरकारी रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्य सेवा देण्यात येईल .
याशिवाय देव दर्शन / महाराष्ट्र दर्शन करीता दरवर्षी 15,000/- रुपये आर्थिक अनुदान देण्याची तरतुद आहे . याशिवाय ज्यांचा सांभाळ मुले करत नसतील अथवा वारस नसणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची / जेवण्याची सर्व सोयी – सुविधा राज्य सरकार मार्फत करण्याची तरतुद आहे .