Retirement age: राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची आवश्यकता ; सरकारचे सकारात्मक प्रस्ताव !

Maha. school संगीता पवार प्रतिनिधी [ state employee retirement age update ] : सेवानिवृत्तीचे वय  (Retirement age) 60 वर्षे करण्याची राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांची मोठी मागणी अद्याप पर्यंत प्रलंबित आहे .

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी याशिवाय देशातील तब्बल 25 राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय (retirement age) हे 60 वर्षे इतके आहे . याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांचे निवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याची मागणी बऱ्याच वर्षांपासून केली जात आहे .

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सकारात्मक प्रस्ताव : माननीय एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना राज्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या संप दरम्यान सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे संदर्भात सकारात्मक आश्वासन दिले होते , त्याचबरोबर यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता . सदर प्रस्तावाला मंजुरी करिता विधान सभेत सादर करण्यात आला होता परंतु या प्रस्तावाला…

अनेक आमदार तसेच स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थी संघटने कडून विरोध केल्याने ,  सदर प्रस्तावाला मंजुरी मिळाली नाही . यामुळेच कर्मचाऱ्यांची ही मागणी अद्याप पर्यंत प्रलंबित आहे .

सेवानिवृत्तीचे वय  (Retirement age ) 60 वर्ष करण्याची आवश्यकता : सध्या सरकारी नोकरीसाठी मोठी स्पर्धा होत आहे , यामुळे कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होण्यापर्यंत 30 वर्षे निघून जातात , यामुळे कमी सेवा मिळत आहे .

सध्याची सुधारित पेन्शन योजना ( UPS , NPS , NEW NPS ) ह्या सेवा कालावधी नुसार आधारित असल्याने , पेन्शनचा निश्चित टप्पा , पूर्ण पेन्शन लाभ मिळत नाही ..( 1 , 2 वर्षाच्या अभावामुळे पूर्ण पेशन लाभ पासून वंचित राहून जातील. तसेच  अनेक कर्मचारी प्रदीर्घ सेवेत पदोन्नती करिता 01 , 02 वर्षामुळे संधी निघून जाते , यामुळे कर्मचाऱ्यांच्या या हितास्तव निवृत्तीचे वाढ करणे आवश्यक आहे .

प्रशासनाच्या बाजूने विचार केला असता , निवृत्तीचे वय वाढविल्यास अनुभवी कर्मचाऱ्यांचा प्रशासन कामकाजामध्ये मोठा हातभार लागेल . या बाजूंच्या विचार करून महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे गरजेचे आहे.

Leave a Comment