Maha.School संगिता पवार प्रतिनिधी [ Which allowances of employees will be increased in the new Pay Commission? ] : नविन वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोण-कोणत्या भत्तामध्ये वाढ होईल याबाबत सविस्तर माहिती या लेखांमध्ये घेवूयात .
01.महागाई भत्ता ( DA ) : सध्या सातवा वेतन आयोग सुरु आहे , नविन वेतन आयोग हा दि.01.01.2026 पासुन लागु केला जाणार असून , प्रत्यक्षात सदर वेतन आयोग माहे सप्टेंबर 2027 पर्यंत लागु होईल . यांमध्ये डी.ए चे दर दि.01.01.2026 पासुन शुन्य टक्के होईल . व नव्याने डी.ए दर वाढत जाईल .
02.घरभाडे भत्ता ( HRA ) : सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना मुळ वेतनाच्या 10 टक्के घरभाडे अदा केला जातो . तर नविन वेतन आयोगांमध्ये सदर दर हे 15 टक्के पर्यंत वाढेल .
03.प्रोत्साहन भत्ता : जे कर्मचारी / अधिकारी हे नक्षलग्रस्त / आदिवासी बहुल भागामध्ये कार्यरत आहेत , अशांना दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता मध्ये मोठी वाढ केली जाईल .
04.वाहन भत्ता ( TA ) : सध्या राज्यातील कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणीनुसार वाहन भत्ता अदा केला जातो . तर नविन वेतन आयोगांमध्ये सदर भत्ताची वाढ करताना बाजार मुल्याच्या आधारावर वाढ करण्याची मागणी केली जात आहे . कारण बऱ्याच ठिकाणी सदर भत्ता हा बाजारमुल्यानुसार अदा केला जात नाही .
05.मोबाईल वापर भत्ता : ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचा स्वत : चा मोबाईल कार्यालयीन काम करीता वापर होतो , अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना मोबाई वापर भत्ता अदा करण्याची मागणी नविन वेतन आयोगांमध्ये होत आहे .