पेन्शन धारकांना नविन वेतन आयोग मिळणार का ? जाणून घ्या सविस्तर माहिती !

Maha.School प्रणिता पवार प्रतिनिधी [ Will pensioners get the new pay commission? ] : सरकारी कर्मचाऱ्यांना दर दहा वर्षांनी लागु होणारा वेतन आयोग यंदा दि.01.01.2026 पासुन लागु होणार आहे . दि.01.01.2026 पासुन आठवा ( 8TH Pay Commission ) लागु करण्यात येत आहे .

केंद्र सरकारने नविन वेतन आयोग समितीची स्थापना करुन सदर समितीस आपले कामकाज बाबत , अधिसुचना निर्गमित केली आहे , सदर समिती पुढील 18 महिन्यांमध्ये अहवाल केंद्र सरकारला सादर करणार आहे .

नविन वेतन आयोग हा केंद्र सरकारच्या अधिनस्त येणाऱ्या सर्व सरकारी , रेल्वे कर्मचारी यांना लागु करण्यात येणार आहे . पंरतु या नविन वेतन आयोगांमध्ये काहींना वगळण्यात आले आहेत .

पेन्शन धारकांना नविन वेतन आयोग मिळणार का ? : नविन वेतन आयोगांमध्ये पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये सुधारणा करणेबाबत कोणत्याही प्रकारची तरतुद नसल्याने , सदर समिती पेन्शन धारकांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत कोणतीही शिफारस करणार नाही .

याशिवाय केंद्र सरकारचे नविन वित्तीय कायदा 2025 नुसार पेन्शन धारकांना नविन वेतन आयोग लागु करणेबाबत , तरतुद नमुद नाही . यामुळे पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगाचा लाभ करीता सरकार मार्फत नव्याने विचार केला जाईल .

सदर गठीत समिती पेन्शन धारकांच्या पेन्शन मध्ये वाढ करणेबाबत कोणतीही शिफारस करणार नाही , हे मात्र निश्चित आहे .

नविन वेतन आयोग कधी लागु होणार ? : नविन वेतन आयोग हा दि.01.01.2026 पासुनच लागु होईल , परंतु प्रत्यक्ष लाभ हा माहे सप्टेंबर 2027 पर्यंत लागू होईल . यांमध्ये दि.01.01.2026 पासुनचा वेतन फरकाची रक्कम अदा केली जाईल .

किमान फिटमेंट फॅक्टर : मिडीया रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार किमान 2.00 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे सुधारित वेतन आयोगांमध्ये वेतनश्रेणी सुधारित करण्यात येणार आहे . ज्यामुळे सातवा वेतन आयोगातील विद्यमान वेतनश्रेणीत 40 टक्के पर्यंत वाढ होईल .

Leave a Comment