राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत आज दिनांक 07.01.2026 रोजी निर्गमित झाले 03 महत्वपुर्ण GR

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ 03 important GRs issued today on 07.01.2026 regarding State Officers/Employees ] : आज दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .

01.तात्पुरती ज्येष्ठतायादी : उप संचालक , भुमी अभिलेख गट अ संवर्गाची दिनांक 01 जानेवारी 2026 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतायादी महसुल व वन विभाग मार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे .

02.सेवा पुनर्विलोकन : महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 च्या नियम 10 ( 4 ) नुसार लोकहितास्तव , सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्याना वयाच्या 50/55 वर्षे अथवा अर्हताकारी सेवेच्या 30 वर्षे सेवा पुर्ण झाल्याच्या नंतर सेवेत राहण्याची पात्रता आजमाविणे निर्देश आहेत .

व जे अधिकारी / कर्मचारी सेवेत राहण्यास अपात्र ठरतील अशांना सक्तीने निवृत्त करण्याचे निर्देश आहेत . यानुसार परिवहन विभाग अंतर्गत अधिकाऱ्यांचे वयाच्या 50/55 व्या वर्षानंतर अथवा अर्हताकारी 30 वर्षे सेवा पुर्ण झालेल्यांच्या सेवा पुनर्विलोकन करण्यास मान्यता आली आहे .यांमध्ये ज्यांची सेवा पुढे चालु ठेवण्यास पात्र ठरलेल्यांची यादी सदर निर्णयातील प्रपत्र अ मध्ये नमुद करण्यात आले आहेत .

03.अधिसंख्य पदांस मुदतवाढ : अधिक्षक अभियंता , संकल्पचित्र मंडळ पुल व इमारती नवी मुंबई यांच्या अधिपत्याखालील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकरीता निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांस मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आली आहे .

या संदर्भातील वरील GR डाऊनलोड करण्याकरीता Click Here

Leave a Comment