Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Compensation allowance of Rs. 5000/- to State officers/employees aged 40 years and above. ] : वय वर्षे 40 व त्यापेक्षा अधिक वर्षे झालेल्या राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना रुपये 5000/- इतका प्रतिपुर्ती भत्ता अदा करणेबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दि.22.04.2022 रोजी महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरच्या निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , वय वर्षे 40 वर्षे पेक्षा अधिक वय असणाऱ्या राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना रुपये 5000/- रुपये प्रतिपुर्ती भत्ता अदा करण्याचे निर्देश आहेत . सदर प्रतिपुर्ती भत्ता हा वैद्यकीय तपासणी कारणास्तव अदा करण्याचे निर्देश आहेत .
किती प्रतिपुर्ती भत्ता मिळतो ? : अ) 40 ते 50 वर्षे वयोगटातील – ज्यांचे वय हे 40 ते 50 वर्षे वयोगट दरम्यान आहे , अशा राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना दोन वर्षातुन एक वेळेस वैद्यकीय तपासणी कारणास्तव रुपये 5000/- रुपये वैद्यकीय प्रतिपुर्ती रक्कम अदा करण्याचे निर्देश आहेत .
वय वर्षे 51 व त्यावरील वयोगट : ज्यांचे वय हे 51 वर्षे व त्यापेक्षा अधिक आहे , अशा राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना प्रतिवर्षी ( दरवर्षी ) वैद्यकीय तपासणी कामी 5000/- रुपये वैद्यकीय प्रतिपुर्ती भत्ता अदा करण्याचे निर्देश आहेत .
वैद्यकीय तपासणी करीताचा एक दिवसाचा काळ हा सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांचा कर्तव्य काळ म्हणून समजण्याचे निर्देश आहेत . सदर वैद्यकीय तपासणीचा तपशिल सदर शासन निर्णयांमध्ये नमुद आहेत .
टीप : शक्यतो सदर तपासण्या ह्या राज्यातील शासकीय दवाखान्यात तपासण्याचे निर्देश आहेत , परंतु शासकीय रुग्णालयांमध्ये सदर तपासण्या ह्या उपलब्ध नसतील , अशा प्रकरणी मान्यताप्राप्त खाजगी रुग्णालयांमध्ये तपासणी करण्याचे निर्देश आहेत .
सदर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here