जानेवारी 2026 पासुन सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना 04 मोठे आर्थिक लाभ लागु ; पगारात मोठी वाढ .

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ 04 major financial benefits to be implemented for government employees/pensioners from January 2026 ] : माहे जानेवारी 2026 पासुन सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना 04 मोठे आर्थिक लाभ लागु होणार आहेत , ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकुण वेतना व पेन्शन धारकांच्या एकुण पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे .

01.महागाई भत्ता वाढ : राज्य कर्मचाऱ्यांना जरी माहे जुलैची डी.ए वाढ अद्याप लागु करण्यात आलेली नाही , तरी सदर डी.ए वाढ लवकरच लागु करण्यात येणार आहे . तर केंद्र सरकार मार्फत केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये दि.01.01.2026 पासुन वाढ लागु करण्यात येणार आहे . सदर डी.ए वाढ राज्य कर्मचाऱ्यांना देखिल उशिरा का होईना लागु होईल .

02.डी.ए वाढीचा फरक : राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2025 मधील 03 डी.ए वाढ जानेवारी वेतनासोबत अदा केला जाणार असल्याची बातमी सुत्रानुसार समोर येत आहे . ज्यामुळे माहे जुलै ते डिसेंबर 2025 पर्यंत 06 महिन्यांचा डी.ए फरक अदा केला जाईल .

03.सुधारित वेतन आयोग : सरकारी कर्मचाऱ्यांना दि.01.01.2026 पासुन नविन वेतन आयोग म्हणजेच आठवा वेतन आयोग लागु होणार आहे . प्रत्यक्ष लाभ हे दि.01.01.2026 पासुनच लागु करण्यात येणार असून , प्रत्यक्षात अंमलबजावणीस माहे सप्टेंबर 2027 पर्यंतचा कालावधी लागु शकेल .

04.वेतनवाढ / प्रोत्साहन भत्ता फरक : अनेक कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ ही माहे जानेवारी महीन्यात असते , यामुळे सदर कर्मचाऱ्यांना या महिन्यांत वार्षिक वेतन वाढीचा फरक मिळणार आहे . तर आदिवासी / नक्षलग्रस्त भागांमध्ये कार्यरत असणाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगापासुन मुळ वेतनाच्या 15 टक्के किमान 200/- रुपये व कमाल 1500/- कमाल मर्यादेत प्रोत्साहन भत्ताचा फरक अदा केला जाणार आहे .

आपण सरकारी / निमसरकारी कर्मचारी असला तर कर्मचारी विषयक नियमित अपडेट साठी खालील whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा .

Leave a Comment