राज्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या अतिरिक्त कार्यभार , अतिरिक्त वेतन / विशेष वेतन महत्वपुर्ण GR ; शिक्षकांना देखिल मिळेल लाभ .

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Important Government Resolution regarding additional responsibilities, additional pay/special pay given to state government employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या अतिरिक्त कार्यभार , अतिरिक्त वेतन / विशेष वेतन या संदर्भात महत्वपुर्ण शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या दि.05.09.2018 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , ज्या कार्यालयांमध्ये पदांनुसार आवश्यक अधिकारी / कर्मचारी उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी संबंधित पदाचा कार्यभार हा इतर निम्न संवर्गातील ज्येष्ठ अधिकारी / कर्मचाऱ्यांना सदर पदाचा कार्यभार देण्यात यावा .

अतिरिक्त पदाचा कार्यभार सांभाळताना त्याच्या मुळ पदाचे कर्तव्य व जबाबदारी सांभाळणे आवश्यक असेल . अतिरिक्त कार्यभार सांभाळेल याची खातरजमा वरिष्ठांकडून केले जावे असे नमुद आहे .

अतिरिक्त कार्यभार दिल्याने सदर कर्मचाऱ्यांस अतिरिक्त वेतन / विशेष वेतन देणे बाबत वित्त विभागाच्या आदेशानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश आहेत . ( महाराष्ट्र नागरी सेवा नियम ( वेतन ) 1981 मधील रियम 56 )

अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शिक्षक संख्या मंजुर असते , परंतु अनेक शाळांवर मंजूर पदांपेक्षा कमी शिक्षक असतात , अशा पदांवर अतिरिक्त पदांचे कार्यभार सांभाळ करीत असणाऱ्या शिक्षकांस अतिरिक्त वेतनाचा / विशेष वेतनाचा लाभावर अधिकार सांगता येईल .

💁 राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नियमित अपडेट देणारे यूट्यूब (Youtube) चॅनेलला सबस्क्राईब ( subscribe ) करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Comment