Maha.shcool संगिता पवार प्रतिनिधी [ Big good news for NPS holders regarding fixed pension ] : राष्ट्रीय पेन्शन धारकांना निश्चित पेन्शन करणेबाबत आत्ताची मोठी महत्वपुर्ण आनंदाची बातमी समोर आली आहे , या संदर्भातील सविस्तर प्रकरण पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन मिळावी या करीता पेन्शन निधी नियामक व विकास प्राधिकरण मार्फत ( PFRDA ) ने महत्वपुर्ण पाऊल उललले आहे .
निश्चित पेन्शन करीता उच्चस्तरीय तज्ञांची समितीची स्थापना : एनपीएस पेन्शन योजना अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शनची रुपरेषा व नियम स्थापित करण्याकरीता PFRDA ने जारी केल्याच्या निवेदनानुसार , NPS धारकांना निश्चित पेन्शन अदा करणेकामी ..
15 सदस्यांची समितीची स्थापना करण्यात आलेली आहे . यांमध्ये भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.एम.एसा.साहु यांच्या अध्यक्षेतखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे .
या समितीमध्ये वित्त , कायदा , भांडवली बाजार , शिक्षण , मुल्यांकन अशा तज्ञ सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे . सदर समितीचे मुख्य उद्देश म्हणजे पेन्शन नियामक काद्यानुसार एनपीएस धारक सदस्यांना निवृत्तीनंतर स्थिर स्वरुपाचे उत्पन्न मिळावे .
सध्याच्या एनपीएस धारकांना आपल्या गुंतवणूकीवर निवृत्तीनंतर स्थिर पेन्शनची हमी नाही , यामुळे यांमध्ये जोखिम अधिक स्वरुपाची दिसून येत असल्याने , यांमध्ये सुधारणा करुन एनपीएस धारकांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शनची हमी दिली जाणार आहे .
आपण सरकारी / निमसरकारी कर्मचारी असला तर कर्मचारी विषयक नियमित अपडेट साठी खालील whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा .
