Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Important rules, procedures and action to be taken if Marathi language exemption is not granted to state employees ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना मराठी भाषा सुट आदेश आवश्यक आहे . याकरीता कर्मचाऱ्यांने मराठी विषय घेवून आपले शिक्षण ..
पुर्ण केले नसेल तर अशा प्रकरणी त्यास भाषा संचालनालयाची मराठी भाषा सुट होणे बंधनकारक असते , अन्यथा त्यास सेवेचे लाभ मिळत नाहीत . या संदर्भातील सविस्तर नियमावली पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
सदर कर्मचाऱ्यांने दहावी ( माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ) किंवा त्यावरील उच्च परीक्षा मध्ये मराठी विषयासह उत्तीर्ण केले असेल तर त्याला मराठी भाषा परीक्षेतुन सुट मिळते , त्या संदर्भात संबंधित कार्यालयांकडून आदेश निर्गमित केले जाते .
वयाची अट : वय वर्षे 50 वर्षे झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांना सदर परीक्षा मधून सुट दिली जाते .
कोणत्या कर्मचाऱ्यांना लागु आहे : सदर मराठी भाषा सुट ही राज्यातील राजपत्रित व अराजपत्रित अशा दोन्ही श्रेणीमधील कायम कर्मचाऱ्यांना लागु आहे . या संदर्भात मराठी भाषा सुट झाल्याचे आदेश सेवापुस्तकांमध्ये नोंद घेणे आवश्यक असते .
जर कर्मचारी मराठी भाषा घेवून दहावी व उच्च शिक्षण उत्तीर्ण नसेल अशा प्रकरणी त्यास भाषा संचालनालयाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असेल . जर सदर कर्मचारी विहीत कालावधीत सदर परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास सदर कर्मचाऱ्यांचे वेतनावाढ थांबवली जावू शकते .