मुंबई मधील सिद्धिविनायक मंदीर आजपासुन पाच दिवस राहणार बंद ; जाणून घ्या कारण !

Maha.school संगिता पवार प्रतिनिधी [ Siddhivinayak Temple in Mumbai will remain closed for five days from today ] : मुंबई येथील दादर या ठिकाणाचा प्रतिष्ठित सिद्धिविनायक मंदीर आजपासुन चक्क 05 दिवसांसाठी बंद राहणार आहे . यामागचे नेमके कारण काय ? ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .

या मंदीरास रोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात , भाविकांची गैरसोय होवू नये याकरीता श्री.सिद्धीविनायक ट्रस्टकडून मंदीर बंद करण्याच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत .

ट्रस्ट मार्फत सांगण्यात आले आहे कि दिनांक 07 जानेवारी ते दिनांक 11 जानेवारी 2026 या कालावधीत मुर्तीला सिंदुर लावले जाणार आहेत . यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पुर्वकल्पना देण्यात आलेल्या आहेत .

ट्रस्टच्या सांगण्यानुसार सदर 05 दिवसांच्या काळांमध्ये भाविकांची गर्दी कमी असते , यामुळे सदर सिंदुर लावण्याचे कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे . तर दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी दुपारी 1.00 वाजता पुन्हा मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे .

या मंदीराचे खास वैशिष्ट्ये म्हणजे मुंबई मधील सर्वात श्रीमंत मंदी आहे . या मंदीराची बांधणी लक्ष्मण विठू व देऊबाई पाटील यांनी दि.19.11.1801 मध्ये केले होते .

Leave a Comment