Marathisanhita पवार प्रतिनिधी [ Six important Government Resolutions (GRs) issued on September 21, 2026, regarding state officers/employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.21.09.2026 रोजी 06 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.क्रिडा विभाग : राष्ट्रीय छात्रसेना कार्यालयांतील गट क व गट ड संवर्गातील नागरी कर्मचाऱ्यांसाठी विभागीय पदोन्नती समिती गठित करण्याबाबत मंजुरी देण्यात आली आहे .
02.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2026 सन 2026-27 चे अनुदान वितरण करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
03.गृह विभाग : संचालक न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय , महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आस्थापनेवरील एकुण 1244 अस्थायी पदांना दि.01.09.2026 ते दि.28.02.2027 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
04.सार्वजनिक बांधकाम विभाग : मुख्य वास्तुशास्त्र महाराष्ट्र राज्य मुंबई अधिक्षक अभियंता ( यांत्रिकी ) सार्वजनिक बांधकाम विभाग नवी मुंबई यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
05.सार्वजनिक बांधकाम विभाग : अधिक्षक अभियंता ( विद्युत ) तथा समन्वय अधिकारी मुंबई यांच्या अधिपत्याखालील कार्यालयातील अस्थायी पदे पुढे चालु ठेवण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
06.कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यंत्रणेतील सहाय्यक आयुक्त ( गट अ ) व कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सन 2026 च्या विनंती बदल्या करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे .
वरील 06 शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- 8वा वेतन आयोग Salary Calculator: Level-4 कर्मचाऱ्यांच्या पगाराची नवी गणना; ग्रॉस सॅलरी ₹1,16,832 पर्यंत?
- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या ताज्या घडामोडी; वेतन, महागाई भत्ता आणि निवृत्तीविषयक अपडेट
- पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची ताजी अपडेट; पेन्शन, तक्रारी आणि डिजिटल सेवांबाबत मोठ्या घडामोडी
- आजच्या कर्मचारी विषयक ठळक बातम्या
- शिक्षक भरतीसाठी रूपांतरित फेरीतील उमेदवारांची शिफारस; ८,३३० रिक्त जागांसाठी ऑनलाइन प्रक्रिया