18 महिन्यांचा थकीत महागाई भत्ता मिळणार ; वन टाईम सेटलमेंट .

Marathi.school संगिता पवार प्रतिनिधी [ You will get 18 months of arrears of dearness allowance. ] : सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी महत्वपुर्ण आनंदाची बातमी समोर येत आहे . ती म्हणजे कोरोना काळांमध्ये रोखून ठेवण्यात आलेल्या डी.ए आता मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे .

प्राप्त माहीतीनुसार कोरोना काळांमध्ये कर्मचारी तसेच पेन्शन धारकांचा 18 महिने कालावधीत डी.ए वाढ रोखून ठेवण्यात आली होती . सदर कालावधीमध्ये सरकारी कर्मचारी हे कर्तव्यावर कार्यरत होते . परंतु त्या काळात केंद्र सरकारच्या निर्णयानंतर केंद्रीय व राज्य कर्मचाऱ्यांचा डी.ए रोखण्यात आला होता .

सदर 18 महिने काळांमध्ये कोणत्याही प्रकारची डी.ए वाढ लागु केली नाही . तर 18 महिने काळानंतर पुढील डी.ए वाढ लागु केली गेली . परंतु कोणताही फरक अदा करण्यात आला नाही .

यामुळे निवृत्तीवेतन धारकांना तसेच कर्मचाऱ्यांना सदर कालावधीत कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ प्राप्त झाला नाही . म्हणून सर्वोच्च न्यायालयांमध्ये याबाबत अनेक याचिका अद्याप पर्यंत प्रलंबित आहेत . न्यायालयात यावर निश्चितच कर्मचाऱ्यांच्या बाजुन निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांना सदर कालावधीमधील डी.ए थकबाकीची रक्कम अदा केली जाईल .

18 महिने कालावधी : दि.01.01.2020 ते दि.30.06.2021 या 18 महिने कालावधीत डी.ए वाढ रोखण्यात आली होती . सदर रोखण्यात आलेल्या डी.ए वाढीच्या बदल्यात वन टाईम सेंटलमेंट करुन डी.ए मध्ये वाढ करण्याची मागणी कर्मचारी युनियन मार्फत सरकारकडे करण्यात येत आहे .

वन टाईम सेटलमेंट : वन टाईम सेटलमेंट म्हणजे 18 महीने डी.ए वाढीची थकबाकी देण्याच्या बदल्यात एकाच वेळेस डी.ए मध्ये वाढ करणे होय . सदर सेटलमेंट 05 टक्के पर्यंत वाढ करुन केली जावू शकेल .

Leave a Comment